Chhagan Bhujbal । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नाव सतत चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे. भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. अनेकदा भुजबळ आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना भेटून त्यांची नाराजी दूर करू असे वक्तव्य अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केले होते. पण ना अजून तटकरे भुजबळांना भेटले ना प्रफुल्ल पटेल ना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) भुजबळांना संपर्क केला. त्यामुळे आता माझ्या भावना मेल्या आहेत, असे वक्तव्य भुजबळ यांनी केले आहे.
Chhagan Bhujbal upset in NCP
त्यांच्या या वक्तव्यावरून पुन्हा एकदा छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि छगन भुजबळ हे एका कार्यक्रमादरम्यान एकत्र आले होते. त्यावरून छगन भुजबळ शरद पवार गटात जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या :