Dhananjay Munde । मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder case) हत्याप्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टर माईंड आहे असा आरोप केला जात आहे. तसंच वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा खास माणूस आहे त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी होते आहे.
या प्रकरणात भाजपचे आमदार सुरेश धस, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर काल अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची भेट होऊन सव्वा तास चर्चा झाली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या कालपासून ऐकायला मिळत आहेत. मात्र, धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही’, असे स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा ठपका असणारे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार पाठीशी घालत आहेत, असं सुरेश धस म्हणालेत. यावर आरोप करणाऱ्यांना आरोप करु द्या अशी धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :