Health tips । अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. याच कारणास्तव त्यांना अनेक मोठं-मोठ्या आजारांचा सामना करावा लागतो. योग्य तो व्यायाम आणि आहार घेऊन तुम्हाला हे जीवघेणे आजार दूर ठेवता येतील.
अनेकांना डायबिटीज म्हणजे मधुमेहाची लागण होते. (Symptoms of Diabetes) महत्त्वाचे म्हणजे या आजारावर कोणताही उपाय नाही. धक्कादायक बाब म्हणजे एकदा का हा आजार झाला की अन्य आजार देखील होऊ शकतात. चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि आहाराकडे दुर्लक्ष केले की अनेकांना या आजाराचा सामना करावा लागतो.
हा आजार झाला तर तुम्ही तुमच्या रक्तातली साखर नियमित तपासायला हवी. टाईप – 2 डायबिटीजग्रस्तांना दिवसातून अनेकदा त्यांची साखर तपासावी लागते. 50 ते 60 वयोगटात रिकाम्या पोटी रक्तातली साखरेची पातळी 90 ते 130 mg/dl, जेवल्यानंतर 140 mg/dl आणि रात्री झोपण्यापूर्वी 150 mg/dl पेक्षा कमी हवी, हे लक्षात घ्या.
Diabetes symptoms
तसेच तुम्ही जेवण वेळेत करावे. वजन वाढू देऊ नये, साखर किंवा गोड पदार्थ खाऊ नये, आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करावेत. तसेच वाढत असणारा तणाव टाळण्याचा प्रयत्न करावा. त्याशिवाय पूर्ण झोप घेणे गरजेचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :