Sharad Pawar । अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. आज परळी कोर्टामध्ये त्यांच्या आमदारकीबाबत महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. अशातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“लोकांमध्ये धर्माबद्दल तेढ निर्माण करण्याचं काम सुरु असून राज्यात काही ठिकाणी परिस्थिती बिघडली आहे. यापूर्वी बीड जिल्ह्याची अशी अवस्था झाली नव्हती. सगळ्या घटकांना घेऊन जाणारा जिल्हा, असा माझा अनुभव आहे. पण बीडमध्ये काही लोकांना सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. तिथे सामंजस्याचे वातावरण होते. जो कोणी कायदा हातात घेईल, त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी शरद पवार यांनी केली.
शेतीमधील एआय तंत्रज्ञानाबद्दलही शरद पवार यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. “एआय तंत्रज्ञानामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडून येईल. याबाबत अनेक कारखान्यांनी उत्सुकता दाखवली आहे,” असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे एक मागणी केली आहे. “तालकटोरा स्टेडियम हे नवी दिल्ली महानगरपालिकाच्या अखत्यारीत येत असल्याने अश्वारूढ पुतळे बसविण्यासाठी आवश्यक परवानग्या देण्यासाठी दिल्ली सरकार आणि NDMC ला निर्देश देण्याबाबत आपण सांगावे, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.
Sharad Pawar Letter to Narendra Modi
दरम्यान, शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे एक मोठी मागणी केली आहे. यावर आता नरेंद्र मोदी शरद पवार यांची मागणी मान्य करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :