🕒 1 min read
Dhananjay Munde । एकीकडे राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण (Santosh Deshmukh murder case) पेटले असताना दुसरीकडे आमदार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती. अखेर संतोष देशमुखांच्या (Santosh Deshmukh) हत्येचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आणि मुंडेंनी राजीनामा दिला.
अशातच आता मंत्रीपदानंतर धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आज त्यांच्या आमदारकीवर परळी कोर्टात महत्त्वाचा निर्णय होणार आहे. जर कोर्टाने मुंडेंची आमदारकी रद्द केली तर मुंडेंना खूप मोठा झटका बसू शकतो.
धनंजय मुंडे यांनी निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रामध्ये त्यांनी करुणा मुंडेंविषयीची (Karuna Munde) माहिती लपवली असा आरोप आहे. या प्रकरणी आज परळी कोर्टामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे.
याबाबत करुणा मुंडे यांनी ऑनलाईन तक्रारीची मूळ कागदपत्रे ५ फेब्रुवारी रोजी कोर्टात दाखल केली आहेत. यात करुणा मुंडे यांच्या नावावर असणाऱ्या मिळकतीची माहिती धनंजय मुंडेंनी निवडणूक आयोगाला दिली नाही, असे समोर आले आहे.
Decision on Dhananjay Munde MLA status today in Parli court
त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी परळीच्या कोर्टामध्ये धनंजय मुंडे यांना कोर्टासमोर हजर राहावे लागणार आहे. याप्रकरणी ते काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :
- अजय देवगण नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत करायचं होतं Tabu ला लग्न, 10 वर्षे वाट पाहिली पण..
- WhatsApp युजर्ससाठी आनंदाची बातमी! अशाप्रकारे जोडता येणार Social Media प्रोफाइलची लिंक
- IPL 2025 साठी सर्व संघांचे कर्णधार फिक्स, जाणून घ्या संपूर्ण लिस्ट एकाच क्लिकवर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












