Dhananjay Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. त्यांना न्याय मिळावा यासाठी ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत.
वाल्मिक कराड (Walmik Karad) हा या हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. काही दिवसांपूर्वीच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. यामुळे आरोपींविरोधात संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
त्यानंतर आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा अजूनही पोलिसांना सापडला नाही. अशातच आता धनंजय देशमुख यांनी आंधळेबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
“राज्यातल्या प्रत्येक घरात हे संतोष देशमुख हत्या प्रकरण गेलं. माझ्या भावाला न्याय मिळण्यासाठी आज प्रत्येकजण लढा देत आहे. आपल्याकडे लोकशाही आहे. कोणी कसं वागावं यावर बंधन नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडल्यानंतर या प्रकरणातील अनेक गोष्टी समोर येतील,” असा दावा धनंजय देशमुख यांनी केला.
Dhananjay Deshmukh on Santosh Deshmukh murder case accused
“माझ्या भावाचे हाल या आरोपींनी केले आहे. जर त्याच्या जखमांना झालेले काळेनिळे रंग, त्याच्या रक्ताचे डाग यातलं काहीही त्यांना आठवलं असते तर काल होळीचे रंग खेळण्याची त्यांची हिंमत झाली नसती,” असे धनंजय देशमुख म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :