Pune News । केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ ( Muralidhar Mohol ) यांचे निकटवर्ती कार्यकर्ता देवेंद्र जोग यांना मारहाण केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणेला (Gaja Marne) अटक केली आहे. यासोबतच इतर आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी कार्यवाही सुरू केली आहे. १ ९ फेब्रुवारी रोजी कोथरूड परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ मिरवणूक सुरू होती, त्यावेळी चार जणांनी बाईकवरून जात असलेल्या देवेंद्र जोग यांना कट मारला. यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला आणि या वादामुळे चौघांनी मिळून देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी कोथरुड पोलिसांनी गंभीर कलम 307 (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना अटक केली आहे. चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे, बाबू हा गजा मारणेचा भाचा असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात इतर आरोपींच्या नावे अमोल तापकीर, ओम जिज्ञासू, किरण पडवळ अशी आहेत.
Muralidhar Mohol reaction
मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली, ‘देवेंद्र जोग भाजपचे कार्यकर्ते आहेत, पण ते माझ्या कार्यालयात काम करत नाहीत. त्यांना चौघांनी बेदम मारहाण केली हे अस्वीकार्य आहे. मी पोलिसांशी संपर्क साधून कठोर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यात असे गुंडगिरीचे वातावरण सहन केले जाणार नाही. चूक करणारा कोणीही असला, तरी त्याच्यावर कायद्याने कारवाई झाली पाहिजे.’
कोथरूड परिसरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात कोथरूड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, चौथा आरोपी बाबू पवार फरार आहे. गेल्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या मिरवणुकीदरम्यान बाईकवरून जाणाऱ्या देवेंद्र जोग यांना चार जणांनी वादातून बेदम मारहाण केली. देवेंद्र जोग हे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निकटवर्ती असून, भाजपचे कार्यकर्ते आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गंभीर कलम ३०७ (खून करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
गुंड गजा मारणेला अटक झाल्या नंतर त्याला पोलिसांनी फरशीवर बसवल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. यावर पत्रकार ब्रिजमोहन पाटील X वर लिहितात,” मालकांना फर्शिवर बसवलय…! पुण्याचे मालक असे रील करणारा कुख्यात गुंड गजा मारणे पोलिसांकडे हजर झालाय. गेल्यावर्षी cp आॅफिसला ओळख परेड सुरू असताना खाली बसला नव्हता. पोलिसच डाॅन असले पाहिजेत तर लोक सुरक्षित राहतील मुरली मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला माराहण केल्यानंतर कारवाई केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
Pune Police arrests Gaja Marne
पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले असले तरी काही पुणेकरांचे मत आहे की, धुडगूस घालणाऱ्या गुंडांवर कारवाई करण्यास उशीर झाला आहे. या गुंडांनी अनेक दिवसांपासून शहरात दहशत माजवली होती, राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यानंतरच ही कारवाई करण्यात आल्याची पुणेकरांमध्ये चर्चा आहे.
तसेच, पुण्याच्या वारजे माळवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या चार गुंडांविरोधात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) या गुंडांवर कारवाई केली असून, यानुसार त्यांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
या गुंडांमध्ये अभिजित ऊर्फ चौक्या तुकाराम येळवंड, ओंकार ऊर्फ टेड्या उमेश सातपुते, गौरव संजय शेळके आणि ओंकार ऊर्फ ढेण्या सुधाकर चौधरी यांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधात एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या