Santosh Deshmukh । अडीच महिने होऊनदेखील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला नाही, त्यामुळे उद्यापासून मस्साजोगचे नागरिक अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. या आंदोलनामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) देखील सहभागी होणार आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज धनंजय देशमुख यांनी बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांची भेट घेतली. यानंतर धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
“संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या (Santosh Deshmukh murder case) तीन दिवस अगोदर आणि नवनीत कॉवत जॉईन होण्यापूर्वी म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत घडलेल्या घटना त्यांच्या कानावर घातल्या आहेत. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहे. येत्या 28 तारखेला मी हे सगळं लेखी स्वरुपात देणार आहे,” असा गौप्यस्फोट धनंजय देशमुख यांनी केला.
“या हत्याप्रकरणाशी निगडित माझ्याकडे असे काही पुरावे आहेत, की ते नाही मान्य करायची वेळ आली तरी मान्य करावेच लागणार आहेत. सीसीटीव्ही, डीव्हीआर, आणखी भरपूर काही आहे,” असा दावा देखील धनंजय देशमुख यांनी केला.
Dhananjay Deshmukh meet Navneet Kanwat
पुढे ते म्हणाले की, “जे काम स्थानिक गुन्हे शाखेने करायला पाहिजे होते, ते काम आम्ही गावकरी मिळून करत आहे. या पुराव्यांमुळे खूप मोठमोठ्या गोष्टींचा छडा लागेल. आजपर्यंत कोणत्याच कागदावर आणि तपासामध्ये याचा उलगडा झाला नाही,” असेही देशमुख म्हणाले. त्यामुळे आता धनंजय देशमुख पोलिसांना कोणते पुरावे देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :