Manikrao Kokate । नाशिक जिल्हा न्यायालयाने (nashik sessions court) 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार दंड ठोठावला होता. महत्त्वाचे म्हणजे काही तासांमध्येच त्यांना जामीन देखील मंजूर झाला होता.
कोर्टाने शिक्षा सुनावूनही कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद गेले नसल्याने विरोधकांनी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच आता कोकाटे यांच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.
कोर्टाने आता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा देत शिक्षेला स्थगिती दिली आहे. अपिलाचा निकाल येईपर्यंत कोर्टाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. कोकाटे बंधूंना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.
कोर्टाच्या या निकालामुळे कोकाटे यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती नितीन जीवने यांच्याकडून हा निकाल देण्यात आला आहे. परंतु, माजी मंत्री तुकाराम दिघोळे (Tukaram Dighole) यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी आक्षेप फेटाळून लावला आहे.
Manikrao Kokate sentence has been stayed
जरी कोकाटे यांना कोर्टाकडून तात्पुरता दिलासा मिळाला असाल तरी कोकाटे यांच्या आमदारकीवर टांगती तलवार अजूनही कायम आहे. यावर आता माणिकराव कोकाटे आणि विरोधक काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :