Share

CSK चा मोठा निर्णय! IPL पूर्वीच दिग्गज खेळाडूची संघात एन्ट्री

by MHD
Sridharan Sriram joins CSK as assistant bowling coach

CSK । येत्या 22 मार्चपासून आयपीएलला (IPL 2025) सुरुवात होणार आहे. यंदाच्या हंगामात कोणता संघ विजेतेपद जिंकणार याकडे चाहत्यांचे आतापासूनच लक्ष लागले आहे. अशातच आता चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) आयपीएलपूर्वी (IPL) मोठा निर्णय घेतला आहे.

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आयपीएल 2025 साठी चेन्नई सुपर किंग्सकडून माजी अष्टपैलू श्रीधरन श्रीराम (Sridharan Sriram) यांना सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. याचा संघाला आयपीएलसाठी खूप फायदा होईल.

श्रीधरन श्रीराम हे भारतीय संघाकडून केवळ 8 वन-डे सामने खेळले असून यामध्ये एका अर्धशतकासह त्यांनी 81 धावा केल्या आहेत तर एकूण 9 विकेट घेतल्या आहेत. 133 फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्यांनी 52.99 च्या सरासरीने 9539 धावा केल्या आहेत आणि 85 विकेट घेतल्या आहेत.

श्रीधरन श्रीराम यांनी 2016 ते 2022 दरम्यान ऑस्ट्रेलियाने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातही सपोर्ट स्टाफ सदस्य म्हणून काम पाहिले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये त्यांना आशिया कप आणि टी 20 वर्ल्ड कपसाठी बांगलादेशचे टी 20 सल्लागारपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. दिल्ली डेअरडेविल्स आणि लखनौ सुपर जायंट्स संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक होते.

Chennai Super Kings Team

ऋतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एम. एस धोनी, आर. अश्विन, डेवॉन कॉनवे, खलील अहमद, रचिन रविंद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, नूर अहमद, अंशुल कंबोज , सॅम करन, गुरजपनीत सिंग, नॅथन एलिस, दीपक हुडा, जॅमी ओव्हरटन, विजय शंकर, वंश बेदी, श्रेयस गोपाळ, रामकृष्ण घोष, कमलेश नागरकोटी, मुकेश चौधरी, शेख राशिद.

महत्त्वाच्या बातम्या :

A big decision has been taken by CSK for IPL 2025 which is just a few days away. Which can benefit the team.

Sports Cricket IPL 2025 Marathi News