Nitesh Rane । “ठाकरे गटामध्ये दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचे,” असा गंभीर आरोप काल मराठी साहित्य संमेलनात शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी केला होता. यावरून शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष सध्या राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.
शिंदे-ठाकरे गटाच्या या वादामध्ये आता बंदरविकास मंत्री नितेश राणे यांनी उडी घेतली आहे. नीलम गोऱ्हे यांनी ठाकरे गटाविरुद्ध केलेल्या वक्तव्याचे नितेश राणे यांनी पाठराखण करत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
“आजपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय स्वत:चे पैसे खर्च करून जेवले नाहीत. इतकेच नाही तर त्यांच्या घरातला एसीही व्हिडीओकॉनचा लावला होता. त्यामुळे राजकुमार धूत यांना खासदारकी दिली होती. बाहेरगावचे तिकीट किंवा अंतर्वस्त्राचे पैसेही ते स्वत: देत नाही,” असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला आहे.
“संजय राऊत (Sanjay Raut) यांना मला एवढं सांगायचं आहे की जर मालकाचे वस्त्रहरण करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे आणि माझ्या बाजूला बस. आम्ही तुम्हाला उद्धव ठाकरेंच्या गाड्या, कपडे, जेवण कुठून येतो हे सांगतो,” असे आवाहन राणे यांनी दिले आहे.
Nitesh Rane on Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरे यांच्या आतादेखील घराची लाँड्री ही लीला हॉटेलमधून करण्यात येते. त्यांच्या घरात जे सँडविच जातात ते ट्रायडेंट हॉटेलमधून जातात. त्यामुळे नीलम गोऱ्हे जे काही बोलल्या आहेत, ते योग्य आहे,” असा घणाघात नितेश राणे यांनी यावेळी केला.
महत्त्वाच्या बातम्या :