Share

“मुरली अण्णा, स्वतःच्या गिरेबानात पाहा…”; रुपाली ठोंबरेंनी भाजपचं वस्त्रहरण केलं, म्हणाल्या “तुमची नीती वापरा आणि…!”

NCP leader Rupali Thombare Patil criticizes BJP and Muralidhar Mohol in Pune, accusing BJP of “use and throw” politics.

Published On: 

Rupali Thombare Shocking Statement on Pune Rape Case

🕒 1 min read

पुणे – राज्यात सत्तेच्या खुर्चीवर मांडीला मांडी लावून बसलेत, पण पुण्याच्या आखाड्यात मात्र महायुतीतल्या नेत्यांनी एकमेकांचे कपडे फाडायला सुरुवात केली आहे की काय? असा प्रश्न सध्या पुणेकरांना पडलाय. अजित पवार गटाच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombare Patil) यांनी थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि भाजपवर शब्दांचे आसूड ओढले आहेत. “मुरली अण्णा, तुम्ही आता खासदार झालात, पण अजितदादा ४० वर्षांपासून राजकारण करत आहेत. त्यांच्यावर बोलताना भान ठेवा,” अशा शब्दांत त्यांनी भाजपला आरसा दाखवला आहे.

Rupali Thombare criticizes BJP and Muralidhar Mohol

पुणे महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू होताच महायुतीतली बिघाडी चव्हाट्यावर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना रुपाली ठोंबरे कडाडल्या. “सुरुवात तुम्ही केली, म्हणून आम्हाला बोलावं लागलं. तुम्ही आमच्याकडे एक बोट कराल, तेव्हा तुमच्याकडे चार बोटं आहेत हे विसरू नका. तुम्ही स्वतःच्या खाली किती अंधार आहे ते झाकून ठेवताय,” असा घणाघात त्यांनी (Rupali Thombare Patil) केला.

गुन्हेगारीच्या मुद्द्यावरून भाजपने अजित पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला, त्यालाही ठोंबरेंनी सडेतोड उत्तर दिलं. “राष्ट्रवादीने शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना तिकीट दिलं नाही. पण भाजपने ज्यांना पळून लावलं होतं, त्यांनाच तिकीटं दिली आहेत, त्याबद्दल मुरली अण्णा कधी तोंड उघडणार?” असा थेट सवाल त्यांनी विचारला.

भाजपची नीती: वापरा आणि सोडून द्या!

भाजप प्रदेशाध्यक्ष आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका करताना रुपाली ठोंबरे यांनी भाजपच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. “भाजपचं कसं आहे, वापरा आणि सोडून द्या. निवडणूक आली की यांना शहाणपण सुचतं आणि समाजात तेढ निर्माण करतात. तुम्हाला एवढंच वाटत होतं, तर तीन वर्षांपूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे का गेला नाहीत?” असा खोचक सवाल करत त्यांनी (Rupali Thombare Patil) भाजप नेत्यांना ‘बालिश वक्तव्य’ न करण्याचा सल्लाही दिला. पुण्यातली ही ‘मैत्रीपूर्ण लढत’ आता किती टोकाला जाते, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही