Share

“आत्मसन्मान असलेली व्यक्ती ‘त्या’ पदावर…”, Sharad Pawar यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा

Sharad Pawar has strongly targeted Dhananjay Munde during the press conference over his demand for resignation.

by MHD

Published On: 

Sharad Pawar criticizes Dhananjay Munde on resignation demand

Sharad Pawar । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीदेखील अजूनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला नाही.

येत्या 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. जर सरकारने तोपर्यंत मुंडेंचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशनादरम्यान सरकारला विरोधक घेरू शकतात. अशातच आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंडेंवर निशाणा साधला आहे.

“आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहत नाही. नैतिकता आणि यांचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही. यापूर्वी आरोप झालेल्या व्यक्तींनी सत्ता सोडली,” अशी टीका शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केली आहे.

तसेच शरद पवार यांनी मर्सिडीजच्या आरोपावर शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हेंवर (Neelam Gorhe) निशाणा साधला. “नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती, हे माझे मत होते कारण हे संमेल्लन चांगलं चाललं होतं. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या. त्या चार टर्म कशा मिळाल्या महाराष्ट्राला माहीत आहे,” असा घणाघात पवार यांनी केला.

Sharad Pawar on Sanjay Raut

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पुरस्कार देण्यावरुन केलेल्या टीकेलाही पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मी कुणाचा सत्कार करायचा आणि कुणाचा नाही याची परवानगी घ्यावी लागत असेल, तर मी लक्षात ठेवेन,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही