🕒 1 min read
मुंबई: महाराष्ट्रातील महायुती सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल सुरूच ठेवले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या सातत्याने बदल्या होत असताना, आता गृह विभागाने तब्बल ५१ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहेत. या मोठ्या फेरबदलामुळे राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील पोलीस दलांमध्ये नवीन चेहरे पाहायला मिळतील. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, धुळे आणि हिंगोली यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधील अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
या बदली आदेशात पुणे शहराला नवीन तीन आयपीएस (IPS) अधिकारी मिळाले आहेत. पुण्यातील शस्त्र निरीक्षक शाखा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तेजस्वी सातपुते यांना राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १, पुणे येथे समादेशक पदावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यापूर्वी, तेजस्वी सातपुते यांनी सातारा पोलीस अधीक्षक म्हणूनही उल्लेखनीय काम केले आहे.
Maharashtra 51 IPS officers Transfers
पुण्यातून इतर काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्याही बदल्या झाल्या आहेत. पुणे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे बदली करण्यात आली आहे, तर वाहतूक पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांचीही बदली झाली आहे.
मुंबईतही पोलीस उपायुक्त स्तरावर मोठे बदल झाले आहेत. एकूण ५ आयपीएस अधिकाऱ्यांची मुंबईत पोलीस उपायुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यात महेंद्र पंडित यांची बृहन्मुंबई पोलीस उपायुक्तपदी बदली झाली आहे. तसेच, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांची मुंबईत पोलीस उपायुक्तपदी नियुक्ती झाली आहे. याशिवाय, विजय पवार, सुनील लोखंडे, नम्रता पाटील आणि स्मिता पाटील यांचीही मुंबईतील पोलीस उपायुक्त पदांवर पदोन्नतीसह नेमणूक करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरू आहे. १५ दिवसांपूर्वी ८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर, गेल्या आठवड्यात पुन्हा चार आयएएस अधिकाऱ्यांचे बदली आदेश जारी करण्यात आले होते. यात मुंबई मेट्रो क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन यांची वर्ध्याच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली होती. तसेच, अमरावतीचे आयुक्त सचिन कळंत्रे यांची बदली पुण्यातील यशदाचे उपसंचालकपदी झाली होती. आता ५१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सरकारने प्रशासकीय यंत्रणेला आणखी गती देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. या बदल्यांमध्ये काही अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे, तर काही अधिकाऱ्यांची केवळ पदस्थापना बदलली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- गुणरत्न सदावर्तेला मराठी माणूस जाम चोपेल! भाजपने त्याच्या तोंडाला पट्टी बांधावी, नाहीतर दात उराणार नाहीत!
- बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! टीकेला कंटाळून मेधा कुलकर्णी रडल्या
- मर्सिडीजवाले आणि ले-आऊटवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; बावनकुळेंचा मोठा बॉम्ब!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








