📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा! टीकेला कंटाळून मेधा कुलकर्णी रडल्या

Pune station naming row escalates; MP Medha Kulkarni breaks down over offensive banners.

Published On: 

Pune Station Naming Row: Medha Kulkarni Emotional Over Banners

🕒 1 min read

पुणे: रेल्वे स्टेशनला ‘थोरले बाजीराव पेशवे’ यांचे नाव देण्याच्या मागणीवरून पुण्यात सध्या चांगलाच राजकीय आणि सामाजिक वाद पेटला आहे. भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी ही मागणी केल्यानंतर, त्यांना समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. इतकेच नाही, तर विविध संघटनांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावांची शिफारस करत मेधा कुलकर्णींच्या मागणीला विरोध दर्शवला. या वादामध्ये आता ‘बुधवार पेठेला मस्तानीचं नाव द्या’ अशा आशयाचे बॅनर झळकल्याने वाद विकोपाला गेला असून, या बॅनरबाजीमुळे खासदार मेधा कुलकर्णी ( Medha Kulkarni ) भावूक झाल्याचं दिसून आलं. टीका करताना अमर्याद भाषा वापरल्याचं सांगताना त्यांना अक्षरशः रडू कोसळलं.

पुणे रेल्वे स्टेशनच्या नावावरून सुरू झालेल्या या वादात अनेकांनी उडी घेतली आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी पुणे रेल्वे स्थानकाला ‘राजमाता जिजाऊ’ यांचे नाव देण्याची मागणी केली आहे, तर शहरात ‘पोस्टर वॉर’ सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार मेधा कुलकर्णी ( Medha Kulkarni ) यांच्या मागणीला उत्तर म्हणून शहरात ठिकठिकाणी खोचक बॅनर लावण्यात आले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे लावण्यात आलेल्या या बॅनरवर, “कोथरूडच्या बाई, नामांतराची एवढी खुमखुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव ‘मस्तानी पेठ’ करा!” असा मजकूर होता.

Medha Kulkarni got emotional over offensive banners

या बॅनरवरील मजकुराबद्दल मेधा कुलकर्णी यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला. “पुणे स्टेशनला सध्या नावच नाही. त्यामुळे, आता आपण सगळे नाव देऊ शकतो. बाजीराव पेशवे भूषणवान नाव आहे, ते नाव द्यावे, असे मत मी मांडले. कोणीही आपलं मत मांडू शकतो, टीका होऊ शकते. पण, मस्तानीचं नाव बुधवार पेठेला द्या म्हणता?” असे म्हणताना मेधा कुलकर्णी भावूक झाल्या.

नामकरणचा निर्णय घेणारे वेगळे लोक आहेत, आपण फक्त अर्ज केला आहे, असं कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. “आमच्यावर टीका होऊ शकते, पण त्याला एक मर्यादा ठेवा,” अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. “मी जगभरात साडी नेसून गेले, माझे पोस्टर लावले, मला खूप वाईट वाटले, अश्लील पोस्टर लावले. काळ सोकावू नये म्हणून तशा लोकांना शिक्षा झाली पाहिजे. टीकेला मर्यादा तर ठेवा, महिला वर्ग म्हणून मी बोलले पाहिजे,” असे म्हणताना त्यांना ( Medha Kulkarni ) रडू कोसळले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!