🕒 1 min read
पुणे, प्रतिनिधी: महाराष्ट्रातल्या प्रशासकीय वर्तुळात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं असून, काही उच्चपदस्थ सरकारी अधिकारी हनीट्रॅपच्या ( Honeytrap ) जाळ्यात अडकल्याचा आरोप उघड झाला आहे. एका महिलेने वरिष्ठ आयपीएस, सनदी अधिकारी आणि शिक्षण विभागातील मुख्याध्यापक यांच्याशी जवळीक साधून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात संबंधित महिलेवर यापूर्वीही गंभीर आरोप झाले होते. २०१६ मध्ये तिने अशाच प्रकारच्या खंडणी प्रकरणात अटकही झालेली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, तिने स्वतःला आर्थिकदृष्ट्या दुर्बल वा विधवा भासवत अधिकारी आणि शिक्षकांशी संपर्क साधला. त्यांचा विश्वास संपादन करत ती त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधू लागली.
Maharashtra Honeytrap Scandal
व्हॉट्सॲप चॅट, व्हिडिओ कॉल आणि प्रत्यक्ष भेटींमधून निर्माण झालेल्या जवळीकिचा गैरफायदा घेत, संबंधित महिलेने गोपनीय फोटो व व्हिडिओ छुप्या पद्धतीने टिपले. नंतर त्यांचा वापर करत संबंधित अधिकाऱ्यांना बदनामी आणि कायदेशीर कारवाईच्या भीतीने खंडणीसाठी धमकावण्यात आलं.
या प्रकरणामुळे अनेक वरिष्ठ अधिकारी धास्तावले असून, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या प्रमुख शहरांतील अधिकारी या जाळ्यात सापडल्याचं उघड होतंय. विशेष म्हणजे, २०१६ मध्ये अटक झाल्यानंतरही या महिलेने नाव बदलून पुन्हा अशा प्रकारची फसवणूक सुरू केल्याचं सांगितलं जातं.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणावर ( Honeytrap ) प्रतिक्रिया देताना म्हटलं, “ठाण्यात अशा प्रकारची एक तक्रार दाखल झाली होती. मात्र, ती परस्पर संमतीने मागे घेण्यात आली. त्यानंतर कोणतीही नविन तक्रार समोर आलेली नाही.”
मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यापासून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- प्रवीण गायकवाड हल्ला: संभाजी ब्रिगेड आक्रमक, दीपक काटेचा ‘काटा’ काढणार
- AI Revenge Porn : प्रियकराने AI वापरून गर्लफ्रेंडची बदनामी केली, १० लाख कमावले
- प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरण: विधानसभेत पडसाद, मुख्यमंत्र्यांकडून कारवाईची माहिती









