🕒 1 min read
पुणे | प्रतिनिधी – शहरात हनीट्रॅपचा एक नवा आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवार पेठेत ( Budhwar Peth ) वेश्यावस्तीत जाऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा पाठलाग करत, त्यांना समाजात बदनाम करण्याची धमकी देत पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. नांदेड सिटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे.
बुधवार पेठेतून येणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य करत त्यांचा पाठलाग करण्याचं एक नवं षड्यंत्र पुण्यात सुरू असल्याचं समोर आलं आहे. नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आलेल्या माहितीनुसार, आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
Pune Budhwar Peth Honeytrap
या आरोपींनी एका फिर्यादीचा बुधवार पेठेतून ( Budhwar Peth ) परतताना पाठलाग केला. त्यानंतर थेट त्यांच्या घरापर्यंत जाऊन, “आम्ही तुम्हाला ऑनलाइन २० हजार रुपये देतो, तुम्ही आम्हाला रोख रक्कम द्या,” अशी बतावणी केली. मात्र, पैसे घेऊन ऑनलाइन ट्रान्सफर न करता, उलट “तुम्ही बुधवार पेठेतून आला आहात, आम्ही तुमची बदनामी करू,” अशी धमकी देण्यास सुरुवात केली. फिर्यादीने विरोध करताच, आरोपींनी पोलिसांच्या हेल्पलाइनवर फोन करून, “आमच्याकडून २० हजार रुपये घेऊन या व्यक्तीने फसवणूक केली आहे,” अशी खोटी तक्रार देण्याचा बनाव रचला.
घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, हे दोन्ही आरोपी फिर्यादीची फसवणूक करण्याचा आणि खंडणी उकळण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण या दोघांनाही अटक केली.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. सामाजिक प्रतिष्ठेला धोका पोहोचेल, या भीतीने अनेकजण अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू शकतात. अशा टोळ्यांकडून पैसे उकळण्याचे प्रकार वाढू लागल्याने, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. अशा कोणत्याही प्रकाराची शंका आल्यास तात्काळ पोलीस मदतीसाठी संपर्क साधावा, असं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- युनियन बँकेच्या ‘मराठीविरोधी’ धोरणाविरोधात मनसे आक्रमक; नागपुरात बँक शाखेबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त!
- हनीट्रॅपच्या जाळ्यात वरिष्ठ अधिकारी; कोट्यवधींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न
- प्रवीण गायकवाड हल्ला: संभाजी ब्रिगेड आक्रमक, दीपक काटेचा ‘काटा’ काढणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now








