Share

IND vs PAK मॅचवेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा…भारतविरोधी घोषणा दिल्याने दुकानावर थेट बुलडोझर

IND vs PAK Match: Bulldozer action against man for raising ‘Pakistan Zindabad’ slogan. Shiv Sena leader Nilesh Rane shared visuals of the demolition on social media.

Published On: 

IND vs PAK Match: Bulldozer action against man for raising ‘Pakistan Zindabad’ slogan.

IND vs PAK :  मालवण (सिंधुदुर्ग) येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर भारतविरोधी घोषणांनी तणाव निर्माण झाला. एका मुस्लिम भंगार व्यावसायिकाने रोहित शर्माच्या विकेटनंतर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्याचा आरोप आहे. स्थानिक नागरिकांनी याला विरोध करताच वाद उफाळला आणि प्रकरण थेट पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले.

या घटनेनंतर शिवसेना नेते व कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी या व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. त्यानुसार मालवण नगर परिषद प्रशासनाने संबंधित व्यक्तीच्या भंगार दुकानावर बुलडोझर चालवून ते उध्वस्त केले. याबाबतचा व्हिडिओ निलेश राणे यांनी सोशल मीडियावर शेअर करत कारवाईचे समर्थन केले.

रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. पाकिस्तानने 241 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने सहज सामना जिंकला.

दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी स्थानिक नागरिकांनी अवैध बांगलादेशी रहिवाशांविरोधात मोर्चा काढत कठोर कारवाईची मागणी केली. सध्या पोलिस तपास सुरू असून, आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

Nilesh Rane shared Video of demolition

शिवसेना आमदार निलेश राणे x वर लिहितात, ” मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिक यानी काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही