Share

महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या Prashant Koratkar विरोधात गुन्हा दाखल

Prashant Koratkar threatening to Indrajit Sawant

कोल्हापुर । इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत ( Indrajit Sawant ) यांना मिळालेल्या धमकीप्रकरणी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात प्रशांत कोरटकर ( Prashant Koratkar ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि जीवे मारण्याची धमकी असे गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने ही कारवाई केली आहे.

धमकीचा ऑडिओ क्लिप सार्वजनिक

इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या धमकीची ऑडिओ क्लिप सार्वजनिक करत सांगितले की, “माझ्या जीवाला धोका आहे, पण त्याहून अधिक महत्त्वाचे म्हणजे महाराजांबद्दल वापरलेले आक्षेपार्ह शब्द असह्य आहेत. त्यामुळे मी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी कठोर कारवाई करावी.”

आवाज माझा नाही – प्रशांत कोरटकर

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना प्रशांत कोरटकर यांनी ऑडिओ क्लिपमधील आवाज आपला नसल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले, “माझ्या नावाचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंद्रजीत सावंत यांनी कोणताही संपर्क न साधता सोशल मीडियावर पोस्ट टाकून मला लक्ष्य केले आहे, त्यामुळे मलाही धमक्या मिळत आहेत. मीही त्यांच्याविरोधात पोलिसांत आणि सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करणार आहे.”

या प्रकरणामुळे कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला इंद्रजीत सावंत यांनी प्रशांत कोरटकर यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे, तर कोरटकर यांनीही आपल्यावर झालेले आरोप फेटाळून पोलिसांत तक्रार करण्याची घोषणा केली आहे. सध्या पोलिसांनी दोन्ही बाजूंचा तपास सुरू केला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया लवकरच ठरेल, असे सांगण्यात आले आहे.

Prashant Koratkar threatening to Indrajit Sawant

महत्वाच्या बातम्या

Prashant Koratkar threatening to Indrajit Sawant | महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ निर्माण करणारी वक्तव्ये आणि जीवे मारण्याची धमकी असे गंभीर आरोप कोरटकर वर ठेवण्यात आले आहे.

Kolhapur Crime Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now