Prashant Koratkar । इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला काल तेलंगणामधून ताब्यात घेतले आहे.
आज त्याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची म्हणजे 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी प्रशांत कोरटकर याला 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती.
परंतु जिल्हा न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत वकील असीम सरोदे (Asim Sarode) यांनी माहिती दिली आहे. “आरोपी प्रशांत कोरटकर याला किमान सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी आम्ही न्यायालयासमोर केली. आवाजाचे नमुने शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून घ्यायचे असतात. आवजामधील स्वर आणि व्यंजन महत्त्वाचे असून आवाजात बदल केला जाऊ शकतो, असे सरोदे म्हणाले.
“मागील एक महिन्यांपासून आरोपी प्रशांत कोरटकर फरार होता. आता तो पोलिसांवर खापर फोडत आहे आम्ही त्याची सात दिवसांची पोलीस कोठडी मागितली,” असेदेखील असीम सरोदे यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, कोरटकरला केवळ तीन दिवसांची कोठडी मिळाली आहे.
Three days Police custody to Prashant Koratkar
दरम्यान, प्रशांत कोरटकर याला पोलीस ठाण्यातून न्यायालयात नेत असताना आणि परत आणत असताना कोल्हापुरमधील शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याच पार्श्वभूमीवर जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर बंदोबस्त करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :