Indrajit Sawant । छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरविरोधात (Prashant Koratkar) गुन्हा दाखल केला होता. पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता पण तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता.
अखेर आज पोलिसांना त्याला अटक (Prashant Koratkar arrested) केली आहे. यावर आता इंद्रजित सावंत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशांत कोरटकरला वाचवण्यासाठी एक यंत्रणा कार्यान्वित होती, असा अंदाज लावू शकतो. त्याची कसून चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी इंद्रजित सावंत यांनी केली आहे.
“कोरटकरला वाचवणाऱ्यांनी त्याला अटक करून घेतले. विकृत व्यक्तीला अटक झाल्याने मला समाधान वाटते. ज्यांनी ज्यांनी कोरटकरला समर्थन दिले, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांचे चेहरे महाराष्ट्राच्या समोर आले पाहिजे,” अशीही मागणी सावंत यांनी केली.
“याप्रकरणी वकील, सरकारी वकील आणि पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने बाजू मांडली होती. म्हणूनच कोल्हापूर न्यायालयातला कोरटकरचा जामीन नाकारण्यात आला होता. उच्च न्यायालयात देखील तशीच परिस्थिती होती,” असे सावंत म्हणाले.
Indrajit Sawant on Prashant Koratkar
“जर त्याला वाचवण्याचे प्रयत्न झाले असतील तर संबंधितावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. सोशल मीडिया असेल किंवा इतर माध्यमांवर हा विषय लावून धरला यासाठी शिवप्रेमींचे पहिल्यांदा मी आभार मानतो, त्यांनी चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला,” असेही इंद्रजित सावंत यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या :