Share

Manoj Jarange Patil यांचा गंभीर आरोप, म्हणाले; “…त्यासाठी फडणवीसांनी घरात दंगल पेटवली”

by MHD
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis over Nagpur violence

Manoj Jarange Patil । नागपूरात दोन गटामध्ये झालेल्या हिंसाचारानंतर (Nagpur violence) त्या ठिकाणी कलम 144 लागू केले आहे. याप्रकरणी विरोधक राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. अशातच आता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.

“शिक्षक, शेतकरी, विद्यार्थी आत्महत्या करीत आहेत आणि हे जाती-जातीमध्ये भांडण लावून आपले राजकारण करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोंगाड्या आहेत, त्यांच्या सोंगात आता जनतेने फसू नये,” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

“राज्यात इतर ठिकाणी लोकांनी औरंगजेबाच्या कबरीला महत्व दिले नाही. म्हणून त्यांनी आपल्याच घरात दंगल पेटवली आहे. या राज्य सरकारला औरंगजेबाची कबर काढायची नाही. नाही तर त्यांनी कबरीच्या दिवाबत्तीला पैसे आणि पोलिसांचा बंदोबस्त केला नसता,” असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.

“देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कुदळ घेऊन यावे, मी त्यांच्या सोबत आताच निघतो. निवडणूक तोंडावर ठेवून असले वाद केले जातात. मराठा आरक्षण दिले नाही. सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही,” असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil on Prashant Koratkar and Rahul Solapurkar

पुढे जरांगे पाटील म्हणाले की, “इथल्या मुस्लिम लोकांना कबरीचे प्रेम असणे गरजेचे नाही, ही दंगल सरकार, फडणवीस पुरस्कृत आहे. यांना तो प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar), राहुल सोलापूरकर (Rahul Solapurkar) दिसत नाही का? तिथे यांचे हिंदुत्व का जागृत होत नाही?,” असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Manoj Jarange Patil has now made serious allegations against Devendra Fadnavis over the violence that took place between two groups in Nagpur.

Marathi News Maharashtra Politics

Join WhatsApp

Join Now