Share

देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो; फोडाफोडीच्या राजकारणावरून लक्ष्मण हाकेंचा थेट हल्लाबोल

‘भाजपचा डीएनए आता कारखानदारांचा झालाय’, अशी घणाघाती टीका करत लक्ष्मण हाके यांनी देवेंद्र फडणवीसांना सद्बुद्धी मिळो असे विठ्ठलाला साकडं घातलं आहे.

Published On: 

OBC leader Laxman Hake criticizing Devendra Fadnavis and BJP government

पुणे– राजकारणात सत्तेसाठी कुणी कोणत्या थराला जाईल, याचा खरंच काहीच नेम उरलेला नाही का? हाच प्रश्न आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. राज्यात फोडाफोडीचं राजकारण शिगेला पोहोचलं असतानाच, हाकेंनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय.

एकनाथ शिंदेंची साथ असताना सत्तेत अजित पवारांच्या गटाला घेण्याची खरंच गरज होती का? असा थेट सवाल हाकेंनी उपस्थित केला आहे. नुसती पक्ष फोडाफोडी करण्यापेक्षा नेत्यांनी आता सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची वेळ आली असल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

Laxman Hake on Devendra Fadnavis

सध्याचे भाजप नेते हे ओबीसींचे राहिले नसून ते आता थेट कारखानदारांचे झाले आहेत, असा गंभीर आरोप हाकेंनी केलाय. “प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हेच आता भाजपचे खरे डीएनए आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.

दुसरीकडे, आषाढी वारीच्या निमित्ताने विठ्ठलाची शासकीय महापूजा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना ‘पक्ष फोडणं बंद करण्याची सद्बुद्धी मिळो’, असं साकडंही त्यांनी थेट पांडुरंगाच्या चरणी घातलं आहे. सत्ता आणि खुर्च्या येत-जात असतात, पण जनतेचे प्रश्न सोडवणं जास्त महत्त्वाचं आहे, अशी उद्विग्नता त्यांनी बोलून दाखवली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही