Eknath Shinde । “औरंगजेब हा क्रूर शासक होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत,” असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी (Harshvardhan Sapkal) केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचा समाचार घेतला आहे.
“हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. फडणवीसांनी हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली? काय केलं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?,” असा सवाल एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
“या राज्यातल्या जनतेला सुखी समाधानी करण्याचा आमचा अजेंडा आहे. औरंगजेब कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? अशी तुलना करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायची,” असा घणाघात शिंदेंनी केला.
तसेच त्यांनी नागपूर हिंसाचार (Nagpur violence) प्रकरणी वक्तव्य केले. “नागपूरमध्ये काही मंदीरातील फोटो जाळण्यात आले. पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले. या हल्ल्यातील समाजकंटकांना शोधून कडक कारवाई केली जाईल,” असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.
Eknath Shinde on Nagpur violence
“या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास वाचला पाहिजे. छावा चित्रपट पाहिला पाहिजे. नागपूरमधील घटना पूर्वनियोजित कट होता,” असा मोठा दावा एकनाथ शिंदे यांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :