Share

नागपूरमध्ये हिंसाचार कोणी घडवला? Sanjay Shirsat यांनी थेट घेतले नाव

Sanjay Shirsat has targeted the Mahavikas Aghadi over the violence in Nagpur. This may heat up the political atmosphere.

by MHD

Published On: 

Sanjay Shirsat allegation MVA on Nagpur violence

Sanjay Shirsat । नागपुरातील महाल परिसरात औरंगजेबच्या कबरीला (Aurangzeb Tomb) हटविण्यावरुन काल दोन गटांत भीषण राडा झाला. याच पार्श्ववभूमीवर नागपूरमध्ये कलम 144 लागू केले आहे. यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीवर (MVA) निशाणा साधला आहे.

“ज्या ठिकाणी औरंगजेबाची कबर आहे, त्या ठिकाणी मस्लिम लोक जात नाहीत. मुस्लिमांना कबरीशी काहीच देण-घेण नाही. नागपूरमध्ये घडलेली कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली आहे,” असा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

संजय शिरसाट पुढे म्हणाले की, “ही लोक अशी मुर्खपणाची वक्तव्य करत आहेत. त्यांना आम्ही मानत नाही. विरोधकांना कालची घटना अंगलट आली आहे हे त्यांना समजलं आहे. राज्यात आम्हाला कुठेही दंगल नको आहे,” असे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केले.

“छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा इतिहास जर औरंगजेबामुळे लिहायचा असं जर यांचं संशोधन असेल तर महाराजांच्या बाजूला औरंगजेबाचा पुतळा उभा करायाचा आहे का?,” असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

Sanjay Shirsat criticize MVA

दरम्यान, नागपूरमधील घडलेल्या घटनेला संजय शिरसाट यांनी थेट महाविकास आघाडीला जबाबदार धरले आहे. यामुळे राजकीय वातावरण चिघळू शकते. यावर आता महाविकास आघाडी काय उत्तर देते? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही