बीड । मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ( Santosh Deshmukh Murder Case ) भाजपचे आमदार सुरेश धस ( Suresh Dhas ) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना पत्र लिहून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणातील पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच, वाशी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची सीडीआर तपासणी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे:
- ग्रामस्थांचे आंदोलन: मस्साजोग गावातील ग्रामस्थ संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ अन्नत्याग आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात.
- फडणवीस यांचे आश्वासन: हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप काही आरोपी मोकाट फिरत आहेत.
- फरार आरोपीचा तपास: हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून, ७२ दिवस उलटूनही त्याला अटक करण्यात आलेली नाही.
- तपास प्रक्रियेची गती वाढवावी: प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अशीही मागणी आमदार धस यांनी केली आहे.
ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या:
- वाशी पोलीस ठाण्याचे अधिकारी घुले, दिलीप गित्ते, गोरख आणि दत्ता बिकड , हेड कॉन्सेटबल यांचे कॉल डिटेल्सची (CDR) तपासणी करून त्यांना सहआरोपी करावे.
- आरोपींना मदत करणाऱ्या संभाजी वायबसे दांपत्य, बालाजी तांदळे, संजय केदार, सारंग आंधळे व्यक्तींची चौकशी करून त्यांना गुन्ह्यात सहभागी करावे.
- संतोष देशमुख यांचा मृतदेह केज रुग्णालयात नेण्याऐवजी कळंबच्या दिशेने वळवण्यामागील कारणांची चौकशी करावी.
Suresh Dhas Letter to Devendra Fadnavis in Santosh Deshmukh Murder Case
मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून न्याय मिळावा यासाठी ठोस कारवाई करावी, असे आमदार सुरेश धस यांनी त्यांच्या पत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
Ujjwal Nikam appointed in Santosh Deshmukh murder case
तसेच, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वलजी निकम ( Ujjwal Nikam ) यांची नियुक्ती व्हावी यासाठी मागणी केली होती. शिवाय मी स्वतः उज्वलजी निकम यांची भेट घेत त्यांना ही केस घेण्यासंदर्भात विनंती केली असल्याचे धस यांनी सांगितले. आज ही मागणी पूर्णत्वास गेली असून सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे धस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या