🕒 1 min read
Sanjay Raut । घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमती ५० रुपयांनी वाढल्या आहेत. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातली घोषणा सोमवारी करण्यात आली. दरम्यान यावरुन सातत्याने सरकारवर टीका केली जाते आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला आहे.
Sanjay Raut Criticized State Government
या देशांत प्रत्येक बाबतीत, सामान्य माणसांची, गृहिणींची लूट सुरू आहे. निवडणूक आली की लाडकी बहीणसारखी योजना आणायची, चार महिने राबवायची आणि नंतर त्या लाडक्या बहिणींनाही वाऱ्यावर सो़डायचंय, हेच सुरू असल्याचं संजय राऊत यांनी म्हंटल. यावेळी बोलताना त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर देखील सडकून टीका केली आहे.
“कॅगचा रिपोर्ट आहे, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खातं कसं लुटलं, सरकारी पैशांची कशी लूट केली. मालक लूट करत आहेत, म्हणून अधिकारीही लुटायला लागले, ते स्प्ष्ट दिसतंय”, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. त्याचबरोबर एकनाथ शिंदेनी नगरविकास खातं कसं लुटलं? त्याची चौकशी व्हायला पाहीजे, अशी मागणीही त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या :
- मारहाण प्रकरणात Malaika Arora च्या अडचणीत वाढ? कोर्टाकडून जामीनपात्र वॉरंट पुन्हा जारी
- “तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी पळवाटा…”; Vijay Wadettiwar यांची घणाघाती टीका
- Kunal Kamra याला दिलासा; मद्रास उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now