Pune Rape Case | पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने पुणे शहरात खळबळ उडाली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे ( Dattatray Gade ) हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही चेन स्नॅचिंगसारखे गुन्हे नोंदवलेले आहेत. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
नेमकं काय-काय घडलं?
- पहाटे पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात फलटणला जाण्यासाठी थांबली होती.
- आरोपी दत्तात्रय गाडे ( Dattatray Gade ) तिथे फिरत असताना तरुणीला एकटी पाहून तिची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू लागला.
- गाडेने तिला सांगितले की, सोलापूरहून येणारी बस फलटणला थांबेल, त्यामुळे तिने त्याच्यासोबत बसमध्ये चढावे.
- तरुणीला ताई – ताई असे म्हणत होता. तरुणीने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि बसमध्ये चढली, त्यानंतर गाडेही तिच्या पाठोपाठ बसमध्ये शिरत, बसचा दरवाजा बंद केला.
- बसमध्ये गाडेने तिच्यावर अत्याचार केला आणि घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
- घाबरलेल्या तरुणीने लगेच कोणालाही सांगितले नाही, मात्र फलटणला पोहोचल्यावर तिने मित्राला घटनेची माहिती दिली.
- त्यानंतर स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.
- दत्तात्रय गाडेवर ( Dattatray Gade ) भारतीय दंड संहितेच्या कलम ३९२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
महिला आयोगाची प्रतिक्रिया
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी महिलांना सतर्क राहण्याचा सल्ला देत सांगितले की, अनोळखी व्यक्तींवर सहज विश्वास ठेवू नये आणि सार्वजनिक ठिकाणी काळजीपूर्वक वावरावे. महिलांनी सुरक्षिततेची विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करत “समाजात हिंस्र प्रवृत्ती वाढत आहेत, त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे,” असेही चाकणकर यांनी स्पष्ट केले.
स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर अत्याचार; आरोपी अद्याप फरार
या प्रकरणाच्या चौकशीसाठी आठ विशेष तपास पथके नियुक्त करण्यात आली असून, पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. स्वारगेट बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
दरम्यान, स्वारगेट डेपोमधील 23 सुरक्षा रक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच नवीन सुरक्षा रक्षक नेमणुकीचे आदेश परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आले आहेत. तर स्वारगेट डेपो मॅनेजर आणि वाहतूक नियंत्रक यांची चौकशी करून एका आठवड्यात चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश मंत्र्यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या