🕒 1 min read
Pune Rape Case । बुधवारी पहाटे स्वारगेट बस स्थानकात उभ्या असणाऱ्या शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडली. या घटनेमुळे पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. या घटनेचे राज्यासह संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत.
या प्रकरणातील आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. आरोपीला पकडून देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाख रुपयांचं बक्षीस दिले जाणार आहे. अशातच आता याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) हा राजकीय नेत्याचा कार्यकर्ता आहे, अशी माहिती उघड झाली आहे. विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) तो प्रचारात सहभागी झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार राजकीय व्यक्ती आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात हा आरोपी होता.
आरोपीच्या व्हॉट्सअप डीपीवर शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर खटके (Dnyaneshwar Khatke) यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. दत्ता गाडे हा त्यांच्याच गावातील लोकांना उज्जैन येथे असणाऱ्या महाकाल येथे दर्शनाला घेऊन जात असायचा.
Pune Swargate Bus Depot Crime
इतकेच नाही तर तो ज्ञानेश्वर खटके यांचा कार्यकर्ता म्हणून गावात मिरवायचा, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पण ज्ञानेश्वर खटके यांनी तो आपला कार्यकर्ता नसल्याचे सांगितले आहे. फोटो डीपीवर ठेवला म्हणून तो माझा कार्यकर्ता होत नाही, असे स्पष्टीकरण ज्ञानेश्वर खटके यांनी दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- “गुलाबी जॅकेट घातल्याने लाडका भाऊ होत नाही”, Ajit Pawar यांच्यावर पुणे घटनेवरून टीका
- स्वारगेट घटनेतील आरोपीला फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही; Ajit Pawar यांचा संताप
- Ajit Pawar यांची डोकेदुखी ठरलेला आमदार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










