Ajit Pawar । काल राज्यातील पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. संपूर्ण देशभर या घटनेचे पडसाद उमटले आहेत.
स्वारगेटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी एसटी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याने ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार (Deepak Kedar) यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर या घटनेचा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
Deepak Kedar Post on X
दीपक केदार X वर लिहितात, “पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरण जाहीर निषेध! 1500 दिल्याने लाडकी बहीण होत नाही आणि गुलाबी जॅकेट घातल्याने लाडका भाऊ होत नसतो त्यासाठी तुम्हाला महिलांची सुरक्षाच करावी लागेल! पुण्यासारख्या शहरामध्ये बसस्थानक सुरक्षित नाही. बस स्थानकाच्या शिवशाही बसमध्ये ज्या बसला शिवशाही नाव आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रयतेच्या महिलांच्या सुरक्षेला महत्त्व दिले,” असे दीपक केदार म्हणाले.
“आज दुर्दैवाने या राजवटीच्या काळात शिवशाही बसला नाव देऊन त्यात बलात्कार होत आहेत, ही जबाबदारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतली पाहिजे. तात्काळ पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. आरोपीला तात्काळ अटक झाली पाहिजे. त्या बस्थानकामध्ये किती जणांचा छळ झाला, याची चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी दीपक केदार यांनी केली आहे.
दीपक केदार यांनी अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी थेट अजित पवारांच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा मागितला आहे. यावर आता अजित पवार काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते. दरम्यान, स्वारगेट बस स्टँड परिसरात शिवशाही बसमध्ये तरूणीवर अत्याचार करणारा आरोपी अजूनही पोलिसांच्या ताब्यात सापडला नाही. त्याचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे आरोपीला पकडून देणाऱ्या व्यक्तीला 1 लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा पुणे पोलिसांकडून करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :