Pune Rape Case । 25 फेब्रुवारी रोजी स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात शिवशाही बसमध्ये (Swargate rape case Pune) एका 26 वर्षीय तरुणीवर दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याने बलात्कार केला होता. यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट निर्माण झाली होती.
सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पुणे पोलिसांकडून केला जात आहे. अशातच आता याप्रकरणी एक मोठी माहिती समोर आली आहे. “बलात्कार प्रकरणात न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. असीम सरोदे (Asim Sarode) यांची नियुक्ती करावी,” अशी विनंती पीडितेने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांना निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रकरणी पुणे पोलिसांकडून सरकारी वकील म्हणून अजय मिसर यांच्या नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे. परंतु, अजय मिसर यांच्या नावाबाबत राज्य सरकारकडून अजूनही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.
अशातच पीडितेने सरकारी वकील म्हणून असीम सरोदे यांची याप्रकरणी नियुक्त करावे अशी मागणी केली आहे. परंतु, पीडित तरुणीने याबाबत अर्ज देण्यास उशिर केला आहे, असे स्पष्टीकरण पुणे पोलिसांकडून देण्यात आले आहे.
Swargate Rape Case victim new demand
त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी वकील असीम सरोदे असणार की अजय मिसर असणार? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. परंतु, पीडित तरुणीच्या मागणीवरून याप्रकरणी नवीन ट्विस्ट आला असल्याचे पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या :