Krishna Andhale । मागील तीन महिन्यांपासून संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh murder case) आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देत आहे. पोलिसांच्या पथकांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे. दोन वेळा फरार घोषित करूनही तो सापडत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
अशातच आता त्याच्याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरामध्ये कृष्णा आंधळे उभा असल्याची महत्त्वाची माहिती स्थानिकांकडून पोलिसांना देण्यात आली आहे.
इतकेच नाही तर कृष्णा आंधळे याने त्याच्या तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता. तो मोटारसायकल वरून तो पळून गेला, असा दावा देखील स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत.
दरम्यान, जानेवारी महिन्यात देखील कृष्णा आंधळे हा नाशिकरोड परिसरात एका मंदिरात आल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. पोलिसांनी याची माहिती घेतल्यानंतर ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले होते.
First hearing in Santosh Deshmukh murder case
तसेच आज संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणी पहिली सुनावणी संपली आहे. आज आरोपींना VC द्वारे न्यायालयासमोर हजर केले होते. आरोपीच्या वकिलांनी आरोपी आणि फिर्यादींच्या जबाबाच्या कॉपी देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला असल्याने पुढील सुनावणी 26 मार्च रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :