📰
आमचं App डाउनलोड करा! ⭐⭐⭐⭐⭐
सर्वात आधी ताज्या बातम्या मिळवा — Free!
Download करा
Share

“त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न…” सतीश भोसलेला अटक होताच Suresh Dhas कडाडले

Suresh Dhas gave his first reaction in the legislature premises as soon as Satish Bhosale was arrested.

by MHD

Published On: 

Suresh Dhas reaction on Satish Bhosale Arrest

🕒 1 min read

Suresh Dhas । मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत असलेला सतीश भोसले (Satish Bhosale) उर्फ खोक्या भाईला पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. (Satish Bhosale Arrest from Prayagraj) लवकरच त्याला बीड पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. सतीश भोसले याच्यामुळे विरोधक आमदार सुरेश धस यांच्यावर टीका करत आहेत.

सतीश भोसलेला अटक (Satish Bhosale Arrest) होताच सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सतीश भोसले याला अटक झाली ही चांगली गोष्ट आहे. त्याने चूक केली असल्याने त्याला अटक झाली आहे. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर कारवाई केली जाईल,” असे धस म्हणाले.

“मी सतीश भोसलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे आरोप खोटे आहेत. मी याप्रकरणी अजिबात हस्तक्षेप केला नाही. मी कोणत्याच पोलिसाला फोन लावत नाही. भोसले याच्यावर पोलिसांकडून काही कलमे लागली आहेत,” असेही सुरेश धस म्हणाले.

उत्तर प्रदेश पोलीस आणि बीड पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली असून यावर आता विधिमंडळाच्या आवारात सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले आहे.

Suresh Dhas first reaction on Satish Bhosale Arrest from Prayagraj

दरम्यान, बीड पोलिस सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची याप्रकरणी कसून चौकशी करतील. या चौकशीदरम्यान, सतीश भोसलेने आणखी किती कारनामे केले आहेत, याची माहिती लवकरच समोर येईल.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!