IPL 2025 । आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी काही संघाचं टेन्शन वाढलं आहे. कारण करोडो रुपयांची बोली लावलेले खेळाडू दुखपतीमुळे आयपीएल खेळताना दिसणार नाहीत. यामुळे संबंधित संघांना मोठा धक्का बसला आहे.
Mayank Yadav
आयपीएल 2025 च्या पहिल्या सहामाहीत लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) स्टार खेळाडू मयंक यादव याला खेळता येणार नाही. पाठीच्या कण्याला दुखापत झाली असल्याने तो सुरुवातीला आयपीएलचे 7 सामने खेळू शकणार नाही. यामुळे लखनऊ सुपर जायंट्सला मोठा फटका बसला आहे. बीसीसीआयकडून मयंक यादवच्या पुनरागमनाची कोणतीही तारीख निश्चित करण्यात आली नाही.
Mitchell Marsh
मयंक यादव शिवाय, ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिशेल मार्शला दुखापत झाली आहे. यामुळे लखनऊ सुपर जायंट्सच्या चिंतेत भर पडली आहे. आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मिशेल मार्श पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दुखापत झाल्याने त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही माघार घेतली होती.
Jasprit Bumrah
मेगा लिलाव 2025 पूर्वी मुंबईच्या इंडियन्सने (MI) जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपयांमध्ये राखून ठेवले होते. जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात दुखापत झाली. त्यामुळे तो आयपीएल 2025 च्या सुरुवातीला खेळताना दिसणार नाही. एप्रिलमध्येच मुंबई इंडियन्सच्या संघात सहभागी होऊ शकतो.
Star players will not play matches before IPL 2025 due to injuries
Josh Hazlewood
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड भारताविरूद्ध बॉर्डर-गवास्कर ट्रॉफी दरम्यान जखमी झाला होता. त्यामुळे त्याने शेवटचे 2 कसोटी सामने खेळले नव्हते. दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही सहभागी झाला नव्हता. अजूनही त्याच्या फिटनेसबद्दल कोणतीही मोठी अपडेट समोर आली नाही. त्यामुळे आयपीएलच्या 18 व्या हंगामापूर्वी आरसीबीला (RCB) मोठा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :