Sandeep Kshirsagar । नुकतीच आमदार संदीप क्षीरसागर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल (Sandeep Kshirsagar viral audio clip) झाली होती. यामध्ये क्षीरसागर नायब तहसीलदारांना थेट धमकी देत आहेत. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. यावर आता क्षीरसागर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“तो आवाज माझाच आहे. त्या अधिकाऱ्याने जमिनीच्या अनेक प्रकरणात बदमाशी केली. कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्यास आमदार म्हणून अनेक तक्रारी करुन दखल घेतली जात नसेल तर आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार. ही क्लिप दीड वर्षांपूर्वीची आहे. देशमुख हत्या प्रकरण उचलून धरल्याने मला टार्गेट केले जात आहे,” असा आरोप क्षीरसागर यांनी केला आहे.
“दुसऱ्या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी असे विषय हाती घेतले जात आहेत. पण आमचे या प्रकरणावरून लक्ष हटणार नाही. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणामधील आरोपी हत्येवेळी हसत आहेत, कारण त्यांना माहिती होतं, काही होणार नाही. हे असे भ्रष्ट अधिकारीच त्यांना आतापर्यंत पाठिशी घालत होते,” असा दावा संदीप क्षीरसागर यांनी केला.
Sandip Kshirsagar on viral audio clip
पुढे ते म्हणाले की, “नवीन एसपी आल्यामुळे बीडमधील 2 नंबरचे धंदे बंद झाले आहेत. खोक्याबद्ल बोलायचे झाल्यास काही चुकीचं असेल तर त्यावर पोलिसांनी कारवाई करावी,” अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली. संदीप क्षीरसागर यांनी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपवरून स्पष्टीकरण दिले आहे. यावर आता विरोधक काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :