Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर अजूनही उपाय निघाला नाही. मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अजूनही उचलून धरला आहे. अशातच आता जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.
“आता यापुढे कमी सांगायचे, कमी बोलायचे, पण करून दाखवायचे आहे. आता इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागेल. सरकार निवडून येईपर्यंत काही समजू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
“मी आरक्षण मागत आहे म्हणजे मला विनाकारण जातीवादी ठरवू नका. गरिबांच्या लेकरांसाठी आरक्षण लागत म्हणून मी आरक्षण मागत आहे. तुम्ही आमच्या आरक्षणाला विरोध करत आहात म्हणजे तुम्ही जातीवादी आहे,” असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू असून सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. डाव कसे टाकायचे? हे आम्हाला चांगले माहिती आहे. आरक्षण आम्ही घेणारच आहे. थोडी वाट पाहून अशी तयारी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही,” असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
Manoj Jarange Patil on Maratha reservation
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेते का? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :