Anjali Damania । संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यात अजूनही संतापाची लाट कायम आहे. काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या हत्येचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले आणि अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सतत धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत असतात. अशातच आता त्यांनी एक मोठी मागणी केली आहे. “मराठवाड्याला आता खूप स्ट्राँग व्यक्ती देण्याची गरज असून तो कोणाचेही न ऐकणारा असावा. मराठवाड्याला आता मुंडे विरुद्ध मुंडे करण्याची गरज आहे,” अशी प्रतिक्रिया दमानिया यांनी दिली.
“शासनाने तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना डिव्हिजनल कमिशनर, विभागीय आयुक्त म्हणून तिथे पाठवावे. त्यांच्यासारखा स्ट्राँग ऑफिसर आणि स्ट्राँग व्यक्तिमत्वाची महाराष्ट्राला गरज आहे,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.
पुढे त्या म्हणाल्या की,” माझ्याकडे रोज इतकी प्रकरणे, मेसेजेस, व्हिडिओज येतात की बघून मला थकवा येतो. मला रात्री नीट झोप लागत नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात कृषी घोटाळ्याची मालिकाच आहे. त्यांनी ऑफिस ऑफ प्रॉफिट काढले होते,” असा दावा पुन्हा एकदा दमानिया यांनी केला आहे.
Anjali Damania target Dhananjay Munde
दरम्यान, अंजली दमानिया यांनी बीडमधील राजकीय दहशतीवर वक्तव्य करताना राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता अंजली दमानिया यांची मागणी सरकार मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :