Walmik Karad । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणीत भर पडली आहे.
अशातच आता पुन्हा एकदा त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. अवादा कंपनीकडे वाल्मिक कराड यांनी किती वेळा आणि कधी खंडणी मागितली? याची माहिती अवादा कंपनीचे अधिकारी सुनिल शिंदे (Sunil Shinde) यांनी पोलिसांना दिली आहे.
वाल्मिक कराड याने अवादा कंपनीकडे सहा वेळा खंडणी मागितली. 28/8/2024 रोजी फोनवरून कराडने तुम्ही परळीत येवून भेटा नाही तर काम बंद करा अशी धमकी देत खंडणी मागितली. 11/09/2024 रोजी फोनवरून कराडने तुमचे बीड जिल्ह्यात कोठे काम चालू आहे? याची मला माहिती आहे. तुमच्या वरिष्ठांना माझ्याकडे घेऊन या असे म्हणत फोनवरून धमकी दिली.
परळी येथे 08/10/2024 रोजी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि अवादा कंपनीतील अधिकारी शिवाजी थोपटे यांची परळीतील जगमित्र कार्यालयात भेटीदरम्यान प्लांट सुरू ठेवायचा असल्यास दोन कोटी रुपये द्या नाहीतर जिल्ह्यात कुठेही प्लांट चालू देणार नाही, अशी धमकी दिली.
26/11/2024 सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) याने कंपनीत अण्णांनी सांगितलेले दोन कोटी रुपये दिले नाही तर बीड जिल्ह्यात कुठेही काम करू देणार नाही, अशी धमकी चौथ्यांदा दिली होती. 29/11/2024 रोजी विष्णू साठे याने केलेल्या 11:30 च्या सुमारास फोनवरून धमकी दिली.
त्याच दिवशी दुपारी एक वाजता घुले हा मस्साजोगमधील कंपनीच्या ऑफिसमध्ये आला आणि त्याने आज केजमध्ये वाल्मिक अण्णा येणार असून त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा, अशी धमकी दिली.
Walmik Karad demand extortion from Aavada Company
सुदर्शन घुले याने 06/12/2024 रोजी कंपनीच्या सुरक्षारक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याने थोपटे यांना दोन कोटी रुपये खंडणी द्या नाहीतर कंपनी बंद करा असे सांगितले. पण यावेळी संतोष देशमुख यांनी कंपनी बंद करू नका असे येऊन सांगितले, त्यावेळी तुला बघून घेतो. तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी घुले याने दिली होती.
महत्त्वाच्या बातम्या :