Sairat । नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा चित्रपट सैराट हा आजही सगळ्यांच्या लक्षात आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाने 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.
2016 मध्ये रिलीज झालेला सैराट हा चित्रपट प्रेक्षकांना पुन्हा पाहता येणार आहे. नुकतीच सैराट चित्रपटाच्या रि-रिलिजची (Sairat Movie Re-release) घोषणा करण्यात आली आहे. येत्या 21 मार्च रोजी हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. रि-रिलिज झाल्यानंतर हा चित्रपट किती रुपयांची कमाई करतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
नागराज मंजुळे यांनी हा चित्रपट फक्त 4 कोटी रुपयांत बनवला होता. पण या चित्रपटाने जवळपास 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले होते. या चित्रपटाची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
“आम्ही चित्रपटाची निर्मिती केली त्यावेळी विचारही केला नव्हता या चित्रपटाला प्रेक्षक इतके प्रेम देतील. पुन्हा एकदा आमचा हा चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळत आहे. याहून आनंद काय असू शकतो? झी स्टुडिओजला मनापासून धन्यवाद देतो. चित्रपटाच्या पुनर्प्रदर्शनामुळे आम्हाला पुन्हा एकदा तोच अनुभव, तीच उत्सुकता आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल, याची मला खात्री आहे,” अशी प्रतिक्रिया नागराज मंजुळे यांनी दिली आहे.
Zee Studio Marathi on Sairat Movie Re-release Date
याबाबत झी स्टुडिओ मराठीनेदेखील माहिती दिली आहे. “9 वर्षांनी पुन्हा एकदा सुटणार पिरतीचं वारं! सैराटची जादू पुन्हा अनुभवा, आपल्या जवळच्या चित्रपटगृहात 21 मार्चपासून.” अशी झी स्टुडिओ मराठीने (Zee Studio Marathi) अधिकृत घोषणा केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :