Devendra Fadnavis । आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुती सरकारचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2025) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांचे लक्ष होते.
कारण यामध्ये योजनेअंतर्गत 2100 रुपये दिले जाण्याची शक्यता होती. पण अजित पवारांनी याबाबत कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झाल्या असे बोलले जात आहे. विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे.
यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. “2100 रुपये देण्यावर आमचे काम सुरू असून योजना सुरू ठेवण्यासाठी आर्थिक शिस्त ठेवणे गरजेचे आहे. मागील ट्रेंडच्यानुसार पैसे दिले आहेत. वाटले तर पैसे वाढवता येतील. ऑक्टोबर आहे, नोव्हेंबर आहे. आपण बॅलेन्स तयार करत, आपण आश्वासनं पूर्ण करु,” असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
“एप्रिल महिन्यामध्ये 1500 रुपये मिळणार आहे. आम्ही घोषणा करू. पुढच्या महिन्यातून 2100 रुपये मिळणार आहेत. काही लपून या योजनेबाबत घोषणा करणार नाही,” अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Devendra Fadnavis statement on Ladki Bahin Yojana
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार सध्या तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :