Santosh Deshmukh । केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण होऊन गेला आहे. तरीही संतोष देशमुख आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही. दररोज या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील खटला केज (Kaij court) ऐवजी बीडच्या जिल्हा सत्र न्यायालयात (Beed District Sessions Court) चालवण्यात यावा, असा विनंती अर्ज एसआयटीकडून न्यायालयात करण्यात आला होता. या अर्जावर आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाची (Santosh Deshmukh murder case) पहिली सुनावणी ही 12 मार्च रोजी केज न्यायालयात होणार आहे. विशेष सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, 12 मार्च रोजी होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असेल.
कारण अतिशय अमानुषपणे संतोष देशमुख यांची आरोपींनी हत्या केली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात आरोपींविरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
Santosh Deshmukh murder case first hearing
12 मार्च रोजी केज न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्त्वाचे ठरते. शिवाय या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यात पोलिसांना यश येते का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :