Manoj Jarange Patil । मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात (Santosh Deshmukh murder case) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सातत्याने अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधत आहेत. आताही त्यांनी मुंडेंवर टीका केली आहे.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच (Devendra Fadnavis) धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विषयाला पूर्णविराम देण्याचे आदेश देखील फडणवीसांनी दिले आहेत. देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची फडणवीसांची भूमिका नाही,” असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे.
“सीआयडी, तपास यंत्रणा, एसआयटी आणि बीडच्या स्थानिक पोलिसांकडे धनंजय मुंडे खंडणी आणि खुनाच्या गुन्ह्यात असलेले पुरावे आहेत. पण फडणवीस धनंजय मुंडेंना मुख्य आरोपी होऊ देत नाहीत. फडणवीसांना मुंडेंसारखा गुंड पोसायचा आहे,” असा घणाघात जरांगे पाटील यांनी केला आहे.
“फरार झाल्यानंतर आरोपींनी धनंजय मुंडे यांना फोन केला होता, अशी लोकांमध्ये चर्चा सुरु आहे. लवकरच हे तपासामध्ये उघड होईल. ३०२ कलमामध्ये १०० टक्के धनंजय मुंडे आहे. धनंजय मुंडे विषारी साप आहे,” अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis and Dhananjay Munde
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर फडणवीस आणि मुंडे काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :