Anjali Damania । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) तीन महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या हत्याप्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. सातत्याने त्या आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करत आहेत.
यामुळे राजकीय वातावरण बदलले असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. “आरोपींना पोलिसांनी नाही तर आम्ही शोधले आहे असे बालाजी तांदळे (Balaji Tandale) म्हणाला होता. त्यामुळे धनंजय मुंडे हे बालाजी तांदळे याच्यावर प्रचंड संतापले होते. तू जास्त बोलला म्हणून मला त्रास होतोय. मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता,” असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
“संतोष देशमुख हत्याप्रकरण वाल्मिक कराड याच्यावर शेकावे. आपल्यापर्यंत हे प्रकरण येऊ नये, असा धनंजय मुंडे यांचा प्रयत्न होता. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉ. वायबसे आणि त्यांची पत्नी, एसपी बारगळ, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार आणि एलसीबीचे अधिकारी गीत्ते या सर्वांना सहआरोपी करा,” अशी मागणी देखील अंजली दमानिया यांनी यावेळी केली.
“संतोष देशमुख यांचे अपहरण वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी केले हे एलसीबीचे अधिकारी गीत्ते याना माहिती होते. तरीही त्यांनी काहीच केले नाही. कायदा काय म्हणतो तर सकृतदर्शनी पुरावा असेल तर कारवाई झाली पाहिजे,” असे दमानिया म्हणाल्या.
Anjali Damania criticize Dhananjay Munde
पुढे त्या म्हणाल्या की, “धनंजय मुंडे यांनी कराडला कशाप्रकारे शरण यायला लावले. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत,” असा दावा दमानिया यांनी केला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे काय प्रतिक्रिया देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :