Champions Trophy । रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात भारतीय संघाने (Team India) काल तिसऱ्यांदा तब्बल 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. अंतिम सामन्यामध्ये न्यूझीलंडचा भारताने 4 विकेट्सने पराभव केला. महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 9 महिन्यात भारताचे हे दुसरे आयसीसी स्पर्धेचे जेतेपद आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकताच भारतीय संघ मालामाल झाला आहे. आयसीसीने (ICC) ऐतिहासिक विजयासाठी संघाला करोडो रुपयांचे बक्षीस (ICC Champions Trophy Prize Money for India) दिले आहे. भारतीय संघाला विजयानंतर 2.24 दशलक्ष यूएस डॉलर म्हणजेच सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.
इतकेच नाही तर भारतीय संघाला ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी 34 हजार डॉलर्स म्हणजेच अंदाजे 30 लाख रुपये दिले आहे. त्याशिवाय या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संघाला 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
उपविजेता न्युझीलंडच्या संघाला 1.12 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आली. उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
ICC Champions Trophy 2025 Prize Money
याशिवाय बांगलादेश आणि अफगाणिस्तानला 3.5 लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे 3 कोटी रुपये देण्यात आले. पाकिस्तान आणि इंग्लंडला आयसीसीने 1 लाख 40 हजार डॉलर म्हणजेच 1 कोटी 20 लाख रुपये दिले. सर्व संघाना 34 हजार डॉलर्स म्हणजेच ग्रुप स्टेजमधील प्रत्येक विजयासाठी अंदाजे 30 लाख रुपये तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 125,000 डॉलर्स म्हणजेच अंदाजे 1 कोटी रुपये स्वतंत्रपणे दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :