Khokya Bhosle । मागील काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत चालली आहे. राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांवरून गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला आहे की नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.
शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत बाप-लेक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.
वनविभाग आणि पोलिसांनी सतीश भोसले याच्या घराची झडती घेतली आहे. या झडतीदरम्यान वाळलेलं जनावरांचं मांस आणि शिकारीसाठी लागणारं साहित्य पोलिसांना आणि वनविभागाला सापडले आहे. यामुळे पोलिसांनाच मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. सतीश भोसले याच्या विरोधात शिरुर तालुक्यातील नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. पोलीस आरोपीला अटक करत नाहीत? असा सवाल शिरूर ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
Khokya Bhosle house searched by police and forest department
याच पार्श्वभूमीवर उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे. खोक्या आणि खोक्याच्या आकावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. खोक्याचे आका आष्टीत आहेत, असा दावा शिरूर ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे आता पोलीस सतीश भोसले याला अटक करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्त्वाच्या बातम्या :