Santosh Deshmukh । संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाला (Santosh Deshmukh murder case) जवळपास तीन महिने पूर्ण होत आली आहेत. तरीही त्यांना न्याय मिळाला नाही. नुकतेच त्यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
दररोज या प्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. काँग्रेसकडून (Congress) देशमुखांना न्याय मिळावा आणि राज्यात, प्रत्येक जाती-धर्मामध्ये सद्भावना जागृ़त व्हावी, या हेतूने मस्साजोग ते बीड दरम्यान आज सद्भावना रॅली काढण्यात आली.
या रॅलीदरम्यान काँग्रेसने मोठी मागणी केली आहे. “सरपंच संतोष देशमुख यांची हत्या मनाला वेदना देणारी आहे. आरोपींना कठोर शासन तर झाले पाहिजेच, पण संतोष देशमुख यांचे बलिदान पाहता त्यांच्या नावापुढे शहीद असा उल्लेख केला जावा,” अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी केली.
“काँग्रेस पक्ष या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभा राहणार आहे. दुंभगलेली मने आणि समाजमन जोडण्यासाठी आजची सद्भावना आहे. हा महाराष्ट्र आपण पुरोगामी, फुले-शाहू- आंबेडकरांचा असल्याचे आपण म्हणतो. अशा पुरोगामी महाराष्ट्रात एखाद्या उमद्या तरुणाची क्रूर पद्धतीने हत्या होत असल्याने सगळ्या समाजाने आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,” असा सल्लाही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
Harshvardhan Sapkal demands martyrdom mention before Santosh Deshmukh name
पुढे ते म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीमुळे सगळ्या समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. भय, द्वेष, मत्सर आणि पैशाची लालसा यातून एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली आहे,” असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या :