Dhananjay Munde । मागील काही दिवसांपासून अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणीत भर पडत चालली आहे. नुकताच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देऊनही त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “चूक झाली तरी आमचाच बाब्या चांगला. वाल्मिक कराड (Walmik Karad) याने कितीही लोकांना मारू द्या, धनंजय मुंडेंनी कितीही लोकांना मारले तरी आपलाच बाब्या चांगला. ही सवय यांच्यासाठीच घातक होणार आहे,” असा दावा जरांगे यांनी केला.
तसेच त्यांनी औरंगजेबाची कबरीवरूनही भाष्य केले. “औरंगजेब हा नालायक होता. कबरीला संरक्षण तुम्हीच देताय आणि तुमची पैसेही देत आहात. बाबरी मशीदचं काय केलं? करणारे कधीच सांगत नाहीत,” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे यांनी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावरही टीका केली. “छगन भुजबळ हा सडलेल्या डोक्याचा असून डोक्यात फक्त जातीभेद आहे. छगन भुजबळ यांचे जातीवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. स्वप्न बघून मरशील पण स्वप्न पूर्ण होणार नाही,” अशी जहरी टीका जरांगे पाटील यांनी केली आहे.
Manoj Jarange Patil criticizing Chhagan Bhujbal and Dhananjay Munde
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांच्यावर जहरी टीका केली आहे. यामुळे राजकीय वातावरण तापू शकते. यावरून दोन्ही नेते त्यांना काय प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.
महत्वाच्या बातम्या :