IND vs NZ Final । भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना उद्या रंगणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तब्बल 25 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या जेतेपदासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत. क्रिकेटप्रेमींसाठी हा थरार अविस्मरणीय ठरण्याची शक्यता आहे. हा महामुकाबला कसा पाहायचा, त्याची लाईव्ह कव्हरेज कुठे उपलब्ध आहे आणि सामन्याच्या वेळेबाबत सर्व महत्त्वाची माहिती.
याआधी, 2000 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते. मात्र, त्या रोमांचक लढतीत टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता, 25 वर्षांनंतर ( IND vs NZ Final ) दोन्ही संघ पुन्हा एकदा जेतेपदासाठी भिडणार आहेत, त्यामुळे या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
Contents
India vs New Zealand Champions Trophy 2025 Final
सामन्याची वेळ आणि स्थळ:
- दिनांक: 9 मार्च 2025
- वेळ: भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता
- स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
लाईव्ह कसा पाहाल?
IND vs NZ ICC Champions Trophy 2025 Final Match On TV
- TV चॅनेल: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ICC Champions Trophy 2025 Final तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर लाईव्ह पाहू शकता. (हिंदी, इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये समालोचन )
NZ vs IND Champions Trophy 2025 Final Match Live Streaming
- डिजिटल स्ट्रीमिंग: Jio Hotstar ( भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ICC Champions Trophy 2025 Final च्या अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar अॅपवर पाहू शकता.
- रेडिओ: All India Radio (AIR) वर कमेंटरी
Champions Trophy 2025 india playing 11
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
Champions Trophy 2025 New Zealand playing 11
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नाथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.
महत्वाच्या बातम्या