🕒 1 min read
IND vs NZ Final: विश्वचषकाची ट्रॉफी जिंकण्यासाठी कोणता कर्णधार किती मोठा धोका पत्करू शकतो? अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टॉस झाल्यानंतर आता दोन्ही संघांची ‘प्लेईंग ११’ अधिकृतरीत्या समोर आली असून, कॅप्टन सूर्यकुमार यादवने सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे.
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या कुलदीप यादवला फायनलमध्येही बाकावरच बसावं लागलं आहे. सेमीफायनलमधील ‘विनिंग कॉम्बिनेशन’ न बदलता सूर्याने वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मावर पुन्हा एकदा मोठा जुगार खेळला आहे. टीम इंडियामध्ये चक्क एकही बदल झालेला नाही!
भारताची प्लेईंग ११: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.
दुसरीकडे, न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने मात्र ऐन फायनलमध्ये मोठी गुगली टाकली आहे. दव फॅक्टरचा फायदा घेण्यासाठी त्याने किवी संघात मोठा बदल केला असून, फिरकीपटू कोल मॅककॉन्चीच्या ऐवजी वेगवान गोलंदाज जेकब डफीला (Jacob Duffy) थेट फायनलच्या मैदानात उतरवलं आहे.
न्यूझीलंडची प्लेईंग ११: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी.
आता सूर्याचा ‘नो चेंज’ फॉर्म्युला १ लाख ३२ हजार प्रेक्षकांसमोर इतिहास रचणार की सँटनरची गुगली टीम इंडियाला भारी पडणार? हे पाहणं अक्षरशः थरारक ठरणार आहे. राजकारण तापल्यासारखी मैदानावरची हवा आता खऱ्या अर्थाने तापली आहे!
📌 महत्वाच्या बातम्या
- IND vs NZ Final: सूर्याचा सर्वात मोठा जुगार! फायनलच्या ‘प्लेईंग ११’ मध्ये केला नाही एकही बदल
- IND vs NZ Final: मिचेल सँटनरने जिंकला टॉस! टीम इंडियाच्या हातातून निसटला सर्वात मोठा चान्स?
- अहमदाबाद पोलिसांनी रातोरात घेतला मोठा निर्णय! स्टेडियमबाहेर अभूतपूर्व बंदोबस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










