Vijay Wadettiwar । काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अडचणीत भर पडली आहे. कारण त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून नोटीस (Notice to Vijay Wadettiwar) बजावण्यात आली आहे. काय आहे नेमके प्रकरण? जाणून घेऊयात माहिती.
वडेट्टीवार यांनी नामनिर्देशक पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट नारायण जांभुळे (Narayan Jambhule) यांनी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांच्याविरोधात जांभुळे यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे.
इतकेच नाही तर वडेट्टीवार यांनी ज्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले तोच स्टॅम्प पेपर त्यांच्या पत्नी किरण यांनी स्वतः च्या नावे खरेदी केला होता आणि त्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर करू शकत नाही. या कारणामुळे स्टॅम्प कायद्यानुसार वडेट्टीवार प्रतिज्ञापत्र अवैध आहे, असा दावा जांभुळे यांनी केला आहे.
विजय वडेट्टीवार यांना या प्रकरणी आता चार आठवड्यात उत्तर सादर करावे लागणार आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमके काय होते? हे लवकरच समजेल. दरम्यान, यावर विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
Vijay Wadettiwar statement on High Court notice
“आपण याचे उत्तर न्यायालयात देऊ. यापूर्वीही जांभुळे यांनी माझ्या पत्नीच्या नावे स्टॅम्प पेपर होता असे म्हणत निवडणुकीचा फॉर्म भरला. त्यावेळी त्यांनी तक्रार केली होती. पण हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. आता तीच याचिका केली आहे. पण त्यात फारसं काही तथ्य नाही,” असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :